Bookstruck

"हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले."

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१९०१
"हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले."
श्रींनी रामनवमीसाठी बेलधडीस यावे अशी ब्रह्यानंदांनी त्यांना आग्रहाची विनंती केली. त्याप्रमाणे एप्रिल महिन्यात श्री कर्नाटकात गेले. ब्रह्यानंदांचे गुरुदेव येणार म्हणून वकील, डाँक्टर, सरकारी अधिकारी गदगच्या स्टेशनवर हजर होते. तेथून त्यांची प्रसिद्ध वकील जनार्दनपंत यांच्या घरी उतरण्याची सोय केली होती. श्री. भाऊसाहेब केतकर सरकारी अधिकार असल्याने तेही श्रींच्या बाजूला बसले होते. श्री त्यांच्याकडे वळून म्हणाले, "भाऊसाहेब, तुम्ही इकडे कुठे ? आपल्याला भेटून २५ वर्षे झाली, तुमच्याबरोबर मी म्हसवडला आलो होतो. तुम्ही रोज गीता वाचता का ?" त्यावर भाऊसाहेब म्हणाले, "होय, बहुतेक वाचतो." तेव्हा श्री म्हणाले, "म्हणूनच इतक्या वर्षांनी पुन्हा आपली भेट झाली." जुनी ओळख निघाल्यामुळे भाऊसाहेबांना फार आनंद झाला. ते श्रींना लगेच म्हणाले, "आता आपण सर्व मंडळींसह, मी आलो असतो, पण या मंडळींनी मला येथे आणले आहे, तेव्हा त्यांच्याबरोबर राहणे योग्य होईल, परत जाताना तुमच्याकडे येऊन जाई." त्याप्रमाणे बेलधडीला जाऊन रामनवमी झाल्यावर भाऊसाहेबांकडे गदगला आले. त्यांच्याकडे हनुमान जयंती झाली. ब्रह्यानंदांनी तेथे कीर्तन केले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी ( भाऊसाहेबांच्या ) झालेल्या पुनर्भेटीला उद्देशून भाऊसाहेब म्हणाले, "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते तसे मला झाले." भाऊसाहेब पति-पत्नीनी एकदम ठरवले की आता पेन्शन घेतल्यावर गोंदवल्यासच येऊन राहायचे व श्री सांगतील तसे वागायचे. गदगहून श्री यावंगल येथे गेले. तेथे दत्तमंदिराची स्थापना श्रींच्या हस्ते झाली. पुष्कळ अन्नदान झाले. मंदिरास पाणी मिळावे म्हणून विहीर खणली होती. खर्च खूप अला व पाणीही मचूळ लागले. मंदिराचे मुख्य शिवदीक्षित यांनी श्रींना प्रार्थना केली की, विहिरीमध्ये दत्ताचे थोडे तीर्थ घालावे. श्री स्वतः विहिरीवर गेले व पोहरा विहिरीत सोडला. पाण्याने भरल्यावर त्यात दत्ताचे तीर्थ स्वतः घातले व पुन्हा पोहरा विहिरीत सोडला. श्रींनी पुन्हा पोहरा विहिरीतून बाहेर काढला. चूळ भरली व म्हणाले, "पाहा,
पाणी किती गोड आहे,"

« PreviousChapter ListNext »