Bookstruck

वास्तुशुध्दी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वास्तू शुद्धी कशी कराल
वास्तूतील अयोग्य आणि त्रासदायक स्पंदने दूर करून त्यात चांगली स्पंदने निर्माण करणे म्हणजे शुद्धी करणे होय.
वास्तूत कोणताही दोष राहू नये म्हणून हल्ली बांधकाम व्यावसायिक अन् ग्राहक वास्तूशास्त्राचा गांभीर्याने विचार करत आहेत. मात्र या क्षेत्रातही भ्रष्ट व्यक्तींनी शिरकाव केल्याने वास्तूशुद्धीसाठी अनावश्यक खर्चिक विधी करणे, वास्तूच्या रचनेत फेरबदल करणे, असे गैरप्रकार वाढत आहेत. हे टाळण्यासाठी वास्तूदोषामुळे होणार्‍या दुष्परिणामांची काही उदाहरणे आणि वास्तूदोष दूर करण्याच्या इतर प्रचलित पद्धतींपेक्षा कमी खर्चिक अन् सुलभ पद्धती पुढे दिल्या आहेत.

वास्तूशुद्धी करणार्‍याने वास्तूशुद्धी करण्यापूर्वी १५ मिनिटे श्री गणेशाचा वा उपास्यदेवतेचा नामजप करावा !

वास्तूशुद्धी करतांना उपास्यदेवतेचा नामजप मनातल्या मनात वा मोठ्याने करावा; शिवाय वास्तूशुद्धी करण्यापूर्वीही नामजप करणे श्रेयस्कर ठरते. याचे कारण याप्रमाणे आहे.
संपूर्ण वास्तूतील वाईट शक्तींचे निर्मूलन करणे, हे एक प्रकारे वाईट शक्तींना दिलेले मोठे आव्हानच असते. त्यामुळे वास्तूशुद्धी करतांना वाईट शक्तींचा विरोध होण्याची शक्यताही अधिक असते. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला आध्यात्मिक त्रास होऊ शकतो. तो होऊ नये किंवा आपली प्राणशक्ती घटून थकवा येऊ नये, यांसाठी वास्तूशुद्धीपूर्वी १५ मिनिटे श्री गणेशाचा वा उपास्यदेवतेचा नामजप करणे विशेष लाभदायक असते. श्री गणेशाच्या नामजपामुळे प्राणशक्ती वाढते.
वास्तूशुद्धी आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना करावी !वास्तूशुद्धी आरंभ करण्यापूर्वी उपास्यदेवतेला प्रार्थना करावी, हे देवते, तुझ्या कृपेने माझ्याभोवती (स्वतःचे नाव उच्चारावे) संरक्षक-कवच निर्माण होऊ दे, तसेच या वास्तूमधील वाईट शक्तींचे अस्तित्व आणि वाईट स्पंदने नष्ट होऊ देत. वास्तूशुद्धी करत असतांना मध्ये मध्येही प्रार्थना करावी.



« PreviousChapter ListNext »