"# महासुविचारांचा महासंग्रह"

* नशिबाला कुणाच्या नावे ठेऊ नये. नशीब कुणी विकत घेत नाही. ज्याला त्याला कमी जास्त, आपापल्या नशिबाने मिळते.

* कुणाचे चांगले झाले, तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले, तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही.

* बुद्धी कितीही तल्लख असली, तरी नशिबाशिवाय आयुष्यात जिंकता येत नाही, कारण बिरबल कितीही बुद्धीवान असला, तरीही तो राजा होऊ शकला नाही..!

* सगळीच वादळे आपल्याला उध्वस्त करण्यासाठी येत नसतात. काही वादळे आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी येतात.

* कमी बोला, नेमके बोला आणि हळू बोला म्हणजे लोक तुमचे बोलणे ऐकण्यास उत्सुक असतील.

* माणसात देव असतो असे म्हणतात पण माणसात माणूस आहे की नाही हे आधी महत्वाचे आहे.

* तुमच्या आयुष्याचे नियंत्रण तुमच्या स्वत:च्याच हाती ठेवा. म्हणजे काय घडेल? तर, काही बरे वाईट घडले तर दोष द्यायला कोणीच नसेल " - इरिका जौम्ग

* लहान सहान निर्णय ताबडतोब घेण्याची सवय लावा. म्हणजे महत्वाचे निर्णय घायला तुमचे मन मोकळे राहील.

* प्रत्येकजण जग बदलायचा विचार करतो. पण स्वत:ला बदलायचा विचार कुणीच करत नाही. - Leo Tolstoy

* आपण इतरांच्या कशाविषयी तक्रार आणि टीका करतो? अशा गोष्टी विषयी ज्या आपल्याला आपल्याबद्दल आवडत नसतात. - विल्यम हारटन 

* सर्व सुखी कुटुंबे एकसारखी असतात. पण प्रत्येक दु:खी कुटुंब आपापल्या पद्धतीने दु:खी असते - एना केरनीना

* होय म्हणणे ही एक सवय होऊन जाते. लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहेमी ठेवतात. 

* माझ्या आजोबांनी मला एकदा सांगितले होते - लोक दोन प्रकारचे असतात (- इंदिरा गांधी)
एक - जे काम करतात
दुसरे - जे इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे घेतात. 

आजोबांनी पुढे मला सांगितले की तू पहिल्या प्रकारच्या लोकांसारखे बनण्याचा प्रयत्न कर. कारण इथे स्पर्धा कमी असते. 

* आपण केलेल्या चांगल्या कृत्याची कुणी दखल घेतली नाही तर हरकत नाही पण त्या विधात्याकडे आणि निसर्गाकडे ती दखल घेतली जाते आणि आपल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला मिळतेच याबद्दल खात्री बाळगा. 

* घरात वादविवादाची आग लागली असेल तर कृपया ती विझविण्यासाठी तुम्ही बाहेरच्या कुणाही नातेवाईकांना बोलावणार असाल तर सावधान! कारण, फारच थोडे नातेवाईक सोबत पाणी घेऊन येतील. बाकीचे मात्र पेट्रोल, तेल, हवा असे सगळे पदार्थ घेऊन येतील.

* "धनंजय" च्या 2013 च्या दिवाळी अंकातील "असं घडू शकतं" या भयकथेत आलेले 8 विचार 
लेखक : पुरुषोत्तम रामदासी 

1) ज्या देहाचे चोचले पुरविले तो देह आगीच्या भक्ष्यस्थानी पडतो. हे अंतिम सत्य माहित असूनही लोक याच देहाच्या सुखासाठी अविरत झटतात, लबाड्या करतात. शरीर वासनांच्या तृप्ततेसाठी वाट्टेल ते करतात.

2)  प्रकाशाचं कौतुक सगळ्यांनाच असतं. पण प्रकाशापेक्षा अंधार श्रेष्ठ आहे. कारण तो सर्वांना आहे तसा सामावून घेतो.

3) पापाच्या पैशातून पुण्याची खरेदी करता येत नाही.

5) शंका फक्त शंकेलाच जन्म देते.

6) ज्या समयी माणसाची सावली सुद्धा सोबत देत नाही ती वेळ असते बाराची. म्हणून तर आपण म्हणतो : एखाद्याचे बारा वाजले.

7) दु:खात वाटेकरी नसतोच.

8) ज्ञात जगापेक्षा अज्ञात जग फार फार मोठं आहे. अगदी आजच्या कॉम्प्युटर सारखं. त्यामाध्ये अगणित गोष्टी असतात. पण पासवर्ड वापरल्याशिवाय त्या दिसत नाहीत. तसेच सैतानी लोक षटकर्मातील अनेक मंत्र हे अज्ञात जगातल्या शक्तीशी संपर्क साधण्यासाठी वापरतात, जसे सामान्य माणूस प्रार्थनेद्वारे देवाशी कनेक्ट होतो, तसेच!

* अपयशाच्या कहाण्या वाचा, त्यातून तुम्हाला यशाच्या कल्पना सुचतील.

* स्वतःवर प्रेम करायला विसरू नका - सोरेन कर्कगार्ड 

* महानतेच्या शिखरावर नेणारा रस्ता खूप ओबडधोबड आणि कठीण आहे - सेनेका 

* ज्यांना मित्र नसतील त्यांनी ते मिळवावेत. ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत. मित्रांशिवाय जगण्याची वेळ शत्रूवारही येऊ नये. - प्राचार्य शिवाजीताव भोसले

* अशा लोकांपासून दूर राहा जे तुमच्या महत्वाकांक्षेला कमी लेखतात. छोटे लोक असे करतात. महान लोक मात्र तुम्हालाही हिंमत देऊन तुम्हीही महान बनू शकता असे तुम्हाला सांगतात. - मार्क ट्वेन

* माणसाचे खरे रक्षण मित्र आणि ज्ञान करतात. 

* जीवनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे, जीवनातील सगळ्या समस्यांचे समाधान, जीवनातील सगळ्या शंकांना पूर्णविराम आणि जीवनातील सगळ्या भयांची समाप्ती जेथे होते ते ठिकाण म्हणजे भगवदगीता होय.

* आत्म्याकडून परमात्म्याकडे, प्रदर्शनाकडून दर्शनाकडे, सकाम कर्माकडून निष्काम कर्माकडे, स्वार्थाकडून परमार्थाकडे आणि वासनेकडून उपासनेकडे जाणे हेच आयुष्याचे ध्येय असायला हवे - भगवदगीता सार

* स्वातंत्र्याचे सगळयात महत्वाचे रूप म्हणजे आपण जसे आहोत तसेच 'असण्याचे' आपल्याला असलेले स्वातंत्र्य!

* जीवन पुढच्या दिशेने जगायचे असते आणि मागच्या दिशेने समजून घ्यायचे असते.

* "अंजान लोग और अंजान जगहों से हमेशा डर लगता है!" - क्रिश ३ में विवेक ओबेराॅय ने प्रियांका चोप्रा से कहा.

"टेक्नॉलॉजी अपनों से ज्यादा पुलिस को करीब लाती है!" - अनिल कपूर (as जयसिंग राठोड) in 24 on कलर्स

* काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. त्यामुळे त्या ‘जैसे थे’ ठेवणे एवढेच आपण करू शकतो.

* श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगीतली कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही  असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. @ashutoshab

* दुसर्‍याच्या पराभवाची वाट बघणार्‍याला हे समजतच नाही की तो दुसर्‍याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वत:चा वेग आपोआपच कमी होत असतो. @milindmane1972

* बदल कुणीही घडवून आणू शकतो. जे कराल ते मनापासून करा. मनापासून प्रयत्न केल्यास बदल घडतोच. - प्रियांका चोप्रा

* आनंद ही काही भविष्यासाठी साठवून ठेवण्याची गोष्ट नाही. तो आजच घेतला पाहिजे- जिम रॉन

* प्रचंड दडपण असतांनाच धैर्याची खरी कसोटी लागते- अर्नेस्ट हेमिंगवे

* जुनी जाणती आनि वयोवृद्ध मंडळी युद्धाची घोषणा करतात, पण लढावे आणि मरावे लागते ते तरुणांनाच! - हर्बर्ट हुवर

* लेखणी ही आपल्या मनाची जीभ असते - होरॅस

* वागणूक हा एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येकजण स्वत:ची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो!" - जोहान वॉन गॉथे 

* आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं तेव्हा ते फळ गोड असो की कडू खावंच लागतं.

* जीवनात व्यापक अनुभव येण्यासाठी 3 गोष्टी करा - वाचन, पर्यटन आणि श्रवण 

* पुस्तके आणि चांगली माणसे लगेच कळत नाहीत. त्यांना "वाचावं" लागतं! - सुलेखन शिरिष (फेसबुक)

* पुस्तकांसारखा दुसरा मित्र कुणीही नाही. पुस्तकांसारखे श्रेष्ठ आणि पवित्र दुसरे काहीही नाही. 

* वाचण्यासाठी पुस्तके फार जास्त आहेत आणि जीवन आणि वेळ खूप थोडे आहेत. - फ्रॅन्क ज़प्पा

* "तुम्ही जेथेही जाल, तेथील हवामान  कसेही असो, तुम्ही तुमचा स्वत:चा सूर्यप्रकाश  सोबत नेत चला!" -अँथोनी अ‍ॅन्जेलो

* जेथे दान देण्याची शिकवण असते तेथे संपत्तीची कमी नसते. आणि जेथे माणुसकीची  शिकवण असते तेथे माणसांची कमी नसते - नव वर्षा होले

* तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच यशस्वी होतो. तडजोड करायला ज्ञान नाही तर शहाणपण लागते. - मुंबई चौफेर पेपर

* माणूस तोपर्यंत जुना आणि पराभूत होत नसतो जोपर्यंत त्याचा पश्चाताप हा त्याच्या स्वप्नांची जागा बळकावत नाही - पुणे मिरर पेपर  

* अंतिम समयी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, "एखाद्याचे या जगातील ठरलेले विहीत कार्य संपुष्टात आले की त्याने एखादा जास्तीचा क्षणसुद्धा पृथ्वीवर घालवला तर निसर्गाचे संतुलन बिघडते. या जगात प्रत्येक जण एका विशिष्ट कार्यासाठी आलेला असतो. ते पूर्ण झाले की त्याची जायची वेळ येत असते. माझेही धर्मस्थापनेचे कार्य आता झालेले असल्याने मी एक क्षण सुद्धा आता पृथ्वीवर राहाणे योग्य नाही. मला जायलाच हवे". आधार: सोनी टिव्ही सिरियल - सुर्यपूत्र कर्ण: दिनांक - 5 ऑगस्ट 2016) [राम अवतारात रामाने वालीला बाणाने मारले होते. त्याच वालीने पुनर्जन्म घेऊन श्रीकृष्णाला अनावधानाने तळपायाला बाण मारला होता. त्यात श्रीकृष्णाचा मृत्यू झाला होता (अवतार संपला)]

* आधुनिक मनुष्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तो निसर्गापसून दूर गेला आहे. आणि त्यामुळेच तो परमात्म्यापासून सुद्धा दूर गेला आहे. कारण निसर्गातच आपल्याला परमेश्वराची प्रथम झलक प्राप्त होत असते - ओशो

* एका चांगल्या व्यक्तीची ओळख दुसरी चांगली व्यक्तीच करून देऊ शकते.

* तुमच्या मनातील एखादे गुपीत कधीही कुणालाही संगू नका. अगदी मित्रालाही नाही! - चाणक्य

* अहंकारविरहीत केलेली एखादी लहानशी सेवाही मोठीच असते.  

* आत्मा अमर असतो. त्याला अग्नी, शस्त्र आनि काळ सुद्धा नष्ट करू शकत नाहीत. - श्रीकृष्ण 

* कुणाचेच अनुकरण करायला नको, मात्र सगळ्यांकडून थोडे थोडे आपण शिकू तर शकतो, नाही का?