Bookstruck

"कविता संग्रह" (निसर्ग)

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
(६) वीज आणि पाऊस

चंदामामा वीज विकत घेतो...
सूर्यदादा कडून!

चांदण्याताईंना वीज मोफत वाटतो ...
ओंजळ भरून!

महिनाभर निघते आकाश,
प्रकाशाने उजळून!

महीना संपल्यावर सूर्याकडून येते,
विजबीलही भरभरून!

बील भरले नाही तर सूर्यदादा बघतो...
रागाने थरथरून!

चंद्राची वीज कापतो अमावस्येला...
चंद्राकडे पाठवून!

ढगआजोबा करीती थयथयाट...
चंद्राला विझलेला पाहून!

उडल्या वीजरूपी ठीणग्या अन संतापाच्या जलधारा ...
त्यात पृथ्वीताई निघाली न्हाऊन!

(७) कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

माणसाची देवाला विनंती:

असूनही रणरणत्या
उन्हाची वेळ

का चालवलायस तू
पावसाचा खेळ?

बिघडलाय सगळा
ऋतूंचा मेळ

सांग नेमकी कधी आहे
पेरणी ची वेळ?

देवाचे सडेतोड उत्तर:

माणसा तू वृक्षतोड करताना
बघितला नाहीस काळवेळ!

सिमेंट चे जंगल उभारताना
तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ!!

आलाय तुझ्या अंगाशी
तुझाच हा खेळ!

बंद कर मला दोष देण्याचा
तुझा हा पोरखेळ!!

(८) नवा दिवस

नवा दिवस
उगवलाय!

घेवून
नवी पहाट!

आलाय
नवा प्रहर!

टाकून
जुनी कात!

कालचाच मावळलेला
तो सूर्य,
आला आहे!

नव्या आशेचा
नवा सोनेरी किरणांचा
शर्ट घालून!

प्रत्येकाला
जगण्याची
नवी उमेद द्यायला!

प्रत्येकाच्या जीवनात
अंधार दूर करुन
प्रकाश वाटायला!

चला रोज
स्वागत करुया
त्या सूर्याचे !

जो घेवून येतो
आपल्या जीवनात,

रोज एक
नवी पहाट!

नवे चैतन्य!

नवा दिवस!
« PreviousChapter ListNext »