Bookstruck

"हलके फुलके"

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
तुम्हाला एखादी कला उपजत येत असेल तर त्याबद्दल नक्की अहंकार असू नये कारण ती देवाची एक प्रकारे देणगी असते. मग ती कोणतीही कला असो - नृत्यकला, गायन, लेखन, मूर्तीकला, चित्रकला, अभिनय वगैरे.

पण, पण..एक लक्षात घ्या!

देवाने काही ठराविक लोकांबरोबरच तुम्हालाही आणि "तुम्हांलाच" ही कलेची देणगी का बरे दिली आहे?

असा विचार केलाय कधी?

कारण -

  • त्या कलेद्वारे समाजात काहीतरी बदल घडावा, 
  • तुमच्याद्वारे कलेचा उपयोग समाजासाठी व्हावा म्हणून! 
  • आणि देव तुम्हाला ती कला पेलण्यासाठी लायक समजतो म्हणून! 
आणि तुम्ही जर का तुमच्या उपजत कलेचा वापरच केला नाही तर तो एक अक्षम्य अपराध आहे.

जर तुम्ही त्या कलेचा विकास केला नाही, ती जोपासली नाही आणि कलेद्वारे तुम्ही व्यक्त झाला नाहीत तर देव तुम्हाला कधीही माफ करणार नाही, हे लक्षात घ्या!

कारण तो एक प्रकारे देवाने तुमच्या क्षमतेवर दाखवलेल्या विश्वासाचा अपमान आहे.
« PreviousChapter ListNext »