Bookstruck

कथा: असा डाव उलटला

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
सुरेश, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा रितेश जेवण झाल्यावर उशिरा रात्री फिरायला जातांना एका फारशी ओळख नसलेल्या किराणा दुकानावर थांबले. रितेशला चॉकलेट हवे होते. खाल्ल्यावर दात घासले तरच चॉकलेट घेवून देतो असे कबूल करून दुकानात ते कुटुंब शिरले. दुकान फार मोठे नव्हते. तो बंद करण्याच्या तयारीत होता. त्याचे दुकान आणि घर जोडूनच होते.
"एक चॉकलेट द्या, काका" रितेश म्हणाला. डेस्कवर फारच थोडे चॉकलेट दिसत होते.
दुकानदाराला दुकान बंद करण्याची घाई असल्याने पैसे देऊन चॉकलेट घेऊन ते कुटुंब निघाले.
मुलगा हुशार.
थोडे पुढे गेल्यावर तो म्हणाला, "अरे मम्मी, चॉकलेट एक्स्पायर झाले आहे. एक महिना झाला एक्सपायरी डेट संपून."
ते दुकानदाराकडे परत गेले आणि तक्रार करायला लागले.
"तुम्ही एक्स्पायर झालेला माल ठेवता! योग्य नाही हे."
"चालता है ना यार इतना तो. कुछ नाही होता. खाले बेटा"
ते चॉकलेट थोडे लूज झाल्यासारखे सुद्धा वाटत होते.
"दुसरे चांगले चॉकलेट द्या नाहीतर पैसे परत द्या."
तो वाद विवाद करायला लागला.
तेवढ्यात त्या दुकानदाराचा छोटा मुलगा त्याला घरी बोलवायला आला.
"चलो पप्पा! खाना तय्यार है."
सुरेश ला एक आयडीया सुचली.
तो दुकानदाराच्या मुलाला म्हणाला,
"क्या नाम है बेटा तुम्हारा?"
"हिर्मेश"
"बडा अच्छा नाम है. चॉकलेट खाओगे बेटा? फ्री में देता हू! मेरी तरफ से!!"
तो दुकानदाराकडे बघायला लागला.
दुकानदार म्हणाला - "बेटा मत ले. खराब है वो" ... असे म्हणून त्याने लगेच जीभ चावली!
..... आणि रितेश ला नवे फ्रेश ताजे चॉकलेट मिळाले.
« PreviousChapter ListNext »