Bookstruck

कॉमेडी: अजब महिलांदोलन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
विचार करा (फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा) की जर महिला पुरुषांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या तर काय काय घडेल? त्याचा हा विनोदी आढावा....

•पुण्यात महिलांची पुरुषांवर लाटणे फेक. अनेक पुरुष डोक्यावर टेंगुळ येवून जखमी.

•अनेक पुरुष घरी जायला घाबरत आहेत. अनेक दिवस ऑफिसातच मुक्काम ठोकून.

•काही पुरुषांना या आंदोलनाची आधीपासूनच कल्पना असल्याने ते पोळपाट बॅगेत लपवूनच ऑफिसला निघाले होते. त्यामुळे लाटण्यांचा मारा त्यांना काही प्रमाणात परतवून लावता आला.

•अनेक ठिकाणी लाटण्यांवर बंदी घालण्याची पुरुषांची मागणी


•महिलांच्या काही मागण्या कोर्टासमोर सादरः
> आठवड्यातून दोन दिवस स्वयंपाक नवऱ्यांनी करावा

> मंगळसूत्र पुरुषांना अनिवार्य करा.

> लग्नानंतर कपाळावर पुरुषांनी टिकली सारखे गोंदून घ्यावे. त्यासाठी लग्न समारंभात नवरा-कप्पाळ-गोंदण असा कार्यक्रम सामाविष्ट करावा.

> स्त्रीया साडी घालणार नाहीत. शर्ट पँण्ट घालतील.


•महिला पोलिसांचा पुरुषांवर लाठीचार्ज. पुरुष जखमी. अनेक पुरुष चंद्रावर जाण्याच्या तयारीत. तेथे घर बांधून राहाणार असल्याची एका पिडीत नवऱ्याची प्रतिक्रीया.
« PreviousChapter ListNext »