Bookstruck

कॉमेडी: आनंद आणि अंत

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
एक होता आनंद आणि त्याचा मित्र अत्यानंद.

दोन्ही एकदा भेटले.

भेटल्यावर त्यांचा कार्यक्रम ठरलेला.
दारू सिगारेटी पिणे.
दारुचे तीन चार ग्लास आणि सिगरेटी पिऊन झाल्यावर उपहासाने आनंद म्हणाला,

" हे अत्यानंदा, हे बघ, तुला सांगतो स्पष्ट,

ऐकायचे थोडे घे कष्ट.

दारू करीते बुद्धीला भ्रष्ट.

आणि करीते आपल्याला नष्ट."

अत्यानंदाचा पाचवा ग्लास पिऊन झाला होता.

तो म्हणाला,

" मित्रा, आनंदा!

तू हे जे सांगतो आहेस,


ते मला नाही रे पटत.

ही दारू आहे ना,


ती नाही कधी सुटत!"

अचानक झाली दरवाज्यावर ठक् ठक् !!

आणि आत आली एक मादक ललना,

तिच्या हातात होत्या,


आणखी काही दारूच्या बाटल्या !

ती देत गेली.


ते पीत गेले.

शेवटी दोन्ही गेले.

कुठे म्हणून काय विचारता?

अहो, जग सोडून गेले ते दोघे!




.................


तर, आता पात्र परिचय !

त्या मादक ललनेचे नाव:
कुमारी. मृत्यूलता
आणि दरवाज्याबाहेर मोठ मोठ्याने आणखी एक स्त्री हसत होती.

तीचे नाव होते:
कुमारी. व्यसनाधीनता.
तीनेच तर त्या दोघांकडे मृत्यूलतेला पाठवले होते.

कारण तीची आणि त्या दोन मित्रांची आताशा खूप जवळीक झालेली होती........


तात्पर्यः व्यसनाधीनता आपल्याला मृत्यूकडे नेते.....

« PreviousChapter ListNext »