Bookstruck

पुस्तक परीक्षण: संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
२०११ साली  "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" चे मराठी भाषांतर विकत घेतले होते आणि वाचून संपवले. (संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली)

हे एक अप्रतिम पुस्तक आहे. त्याचे लेखक आहेत रॉबिन शर्मा. दक्षिण अमेरिकेतील "शर्मा लिडरशीप इंटरनॅशनल " चे चालक, मालक, संस्थापक. त्यांची व्याख्याने जगभर होतात-व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे धडे याबद्दल.
आणखी माहिती रॉबिनशर्मा डॉट कॉम वर वर मिळेलच.
या लेखाचा मूळ उद्देश्य म्हणजे या पुस्तकाबद्दल मला आलेले अनुभव-
बाजारात व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे तसे अनेक पुस्तके येतच असतात. प्रत्येक पुस्तक बेस्ट्सेलर असल्याचा दावा करत असते.
या सगळ्यात आणखी हे एक पुस्तक?
नाही.
पण यात खूप वेगळेपण आहे.
मुख्य म्हणजे भारतीय वंशाचा लेखक.
दुसरे म्हणजे यात व्यक्तीमत्त्व विकास साधण्यासाठी ज्या पद्धती संगितल्या आहेत त्यांचे क्रेडीट लेखकाने प्रथमच योग्य त्याच व्यक्तींना दिले आहे. त्या व्यक्ती आहेत हजारो वर्षांपूर्वीचे भारतातील (किंवा पूर्वेकडील असे आपण म्हणू शकतो) साधू आणि योगी.
त्यांचेच शास्त्र आपण विसरत चाललो होतो, पण परदेशातील लेखक तेच पण वेगळ्या शब्दांत मांडून पुस्तक लिहितात.
(उदा- ओरिसन स्वेट मार्डेन, नॉर्मन विन्सेंट वगैरे.
शिव खेरांनी ही बर्‍यापैकी लिहिले आहे पण थोडे किचकट आणि नियमांच्या स्वरुपात.)
पण रॉबिन ने ते सगळे क्रेडीट पूर्वेकडच्या लोकांना देण्याचे धाडस प्रथमच करून दाखवले आहे.
या सगळ्या गोष्टी पुस्तकात एका सुरस, अद्भुत काल्पनीक कथेच्या रूपात दिल्या आहेत. जी अगदी खरीखुरी वाटते.
या काल्पनीक कथेत आणखी एक दंतकथा आहे ज्यात प्रतीके म्हणून निसर्गातील व व्यवहारातील काही साध्या वस्तू/गोष्टी वापरल्या आहेत. कशा? ते अगदी वाचून अनुभवण्यासाठीच आहे.
यानंतरची याच मालिकेतली खाली दिलेली पुस्तके ही मी वाचली आहेत.
"द ग्रेटनेस गाईड- १०१ वेज टू रीच नेक्स्ट लेव्हल" हे इंग्लिशमधून तर, "हू वील क्राय व्हेन यू डाय " चे मराठीत भाषांतर मी वाचलेले आहे.
ही दोन्ही पुस्तके ही अप्रतिम आहेत. संग्रही असावीत अशीच आहेत....
« PreviousChapter ListNext »