Bookstruck

लेख: मुलींचे स्कार्फ आणि विरोधाभास!!!

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
नुकतेच वाचनात आले की महिलांचा वापर विघातक कारवायांसाठी होवू शकतो आणि त्या स्कार्फ बांधत असल्याने समस्या आणखी जटील होते, ओळख पटवणे कठीण होते. मागेही एकदा पुणे पोलिस आयुक्तांनी मुलीनी चेहेराभर स्कार्फ़ बांधण्यासाठी विरोध दर्शवला होता.
मुलींचे प्रदुषणा पासून, उन्हापासून संरक्षण व्हावे आणि चेहेरा खराब होवू नये हा जरी उद्देश्य त्यामागचा असला तरी त्याचा वापर आपली ओळख लपवण्यासाठी, आपण कुणाबरोबर फिरतो आहे हे कुणालाही समजू नये अशा अयोग्य गोष्टींसाठीसुद्धा काही मुलींकडून केला जातो, हे सुद्धा तितकेच खरे आहे. सगळयात मोठा विरोधाभास आणि विनोद म्हणजे, स्कार्फने पूर्ण चेहेरा झाकणाऱ्या काही युवतींचे कपडे मात्र अंगप्रदर्शन जास्तीत जास्त कसे होईल असेच असतात. अगदी थंडीच्या दिवसातही रस्त्यावर स्कार्फने पूर्ण चेहेरा झाकणाऱ्या काही मुली आणि महिला अंगावर मात्र पातळ, तंग, आखुड टी-शर्ट घालतात आणि पाय मांड्या उघडे ठेवणारे मिनी स्कर्ट घालतात. 
त्यांना आता थंडीचा त्रास होत नसतो का? इतर शरीराला काय प्रदुषणाचा त्रास होत नाही. फक्त चेहेऱ्यालाच होतो? जरा विचार करा. आहे की नाही विरोधाभास? 
उद्देश्य एकच. आपली फिगर सतत प्रत्येकाला दिसणे हेच नोकरी, कॉलेज व इतर गष्टींपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, असे यांना वाटते!
आणि या उलट परिस्थिती पुरुषांबाबत. पुरुषांनी, मुलांनी स्कार्फ किंवा तत्सम कापड प्रदुषणा पासून, उन्हापासून संरक्षण व्हावे या हेतूने जरी घातले तरी त्याच्या कडे संशयाने बघितले जाते. पुरुषांना प्रदुषणाचा त्रास होत नाही की काय?
डोळे वगळता पूर्ण चेहेरा झाकलेला स्कार्फ नेमक्या कोणत्या कारणासाठी वापरला जातो? 
त्याऐवजी साधा मास्क का नाही वापरला जात? 
स्कार्फ चे वैद्यकियदृष्ट्या अनेक दुष्परिणामही आहेत.
« PreviousChapter ListNext »