Bookstruck

लेख: सकारात्मक दृष्टीकोन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
आजच्या धकाधकीच्या जीवनात नेहेमी सकारत्मक दृष्टीकोन बाळगणे अतिशय महत्त्वाचे आहे.

सकारात्मक दृष्टीकोनाची खालीलप्रमाणे व्याख्या करता येईलः

" सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या विसंगत विचारांना अशा पद्धतीने नियंत्रित करून निवडणे की ज्याद्वारे कोणत्याही व्यक्ती, प्रसंग किंवा परिस्थितीत आपल्याला फक्त जास्तीत जास्त सकारात्मक बाजूच दिसली पाहिजे जेणेकरून आपल्याला कसल्याच प्रकारचे प्रसंग, व्यक्ती ध्येय गाठण्यापासून वंचित करू शकणार नाहीत."

जगात असलेल्या चांगुलपणाच्या शक्तीवर (देव) आपला सतत विश्वास हवा आणि ती शक्ती आपल्या प्रत्येकात असते. म्हणजेच आपण स्वतःवरचा विश्वास गमवायला नको. "स्वतःवर विश्वास ठेवा." हा सगळ्यात महत्त्वाचा मंत्र!
« PreviousChapter ListNext »