Bookstruck

ब्रेकिंग न्यूज: "जलजीवा" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद:

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
ब्रेकिंग न्यूज: "जलजीवा" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद:

आपणास माहीतच आहे की 1 Jan 2011 ते 19 Feb 2011 या कालावधीत मी "जलजीवा" ही सायन्स फिक्शन, थ्रिलर/फँटसी कादंबरी लिहिली होती. ती मायबोली आणि मिसळपाव या वेबसाईटस वर क्रमशः प्रसिद्ध झाली होती आणि जगभरातील अनेक मराठी वाचकांना ती आवडली होती आणि तशा प्रतिक्रियासुद्धा मला आल्या होत्या आणि अजूनही येत असतात.

2016 साली ती बुकस्ट्रकने ती प्रकाशित केली आणि त्यापाठोपाठ ईसाहित्य.डॉटकॉम तसेच डेलीहंटने पण ती प्रकाशित केली. तसेच गुगल प्लेस्टोर वर सुद्धा ती उपलब्ध आहे. बुकस्ट्रक तर्फे त्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट फँटसी कादंबरी चा पुरस्कार मिळाला होता.

आज एका वर्तमानपत्रात एक बातमी दिसली आणि मग मी इन्टरनेट वर शोध घेतला. त्यानुसार 22 ऑक्टोबर 2016 च्या एका बातमीनुसार बर्मुडा ट्रँगल मध्ये जहाज आणि विमानं गायब होण्यामागे षटकोनी आकाराचे ढग कारणीभूत आहेत जे गरम असून एखाद्या बॉम्ब सारखे स्फोटक असतात असे सांगितले आहे.

माझ्या "जलजीवा" कादंबरीत सुद्धा "बर्मुडा ट्रँगल" वरून प्रेरित होऊन मी "डेव्हिल्स स्क्वेअर" नावाचा एक समुद्रातील चौकोनी भाग दाखवला आहे ज्यात असेच विमानं आणि जहाज गायब होतात आणि त्याचे कारण ढग (जलजीवा रूपातील) आहेत असे मी लिहिले होते.

काय योगायोग आहे बघा, एखादी कल्पना नंतर सत्यात उतरू शकते किंवा एखादे रहस्य ते उलगडण्यापूर्वीच एखाद्याच्या कल्पनेत उलगडू शकते! अर्थात कादंबरीत थोडा ज्यादा फँटसी इलेमेंट आहे. पण मी असं नक्की म्हणू शकतो की माझी कादंबरी सत्याच्या 50 टक्के जवळ जाणारी सिद्ध झाली आणि अर्थातच हे सांगायला मला आनंद वाटतो. नाहीतरी कोणतीही गोष्ट सत्यात उतरण्याआधी ती मनात (कल्पनेत) तयार व्हावी लागते. एखादा मूर्तिकार जेव्हा मूर्ती बनवतो तेव्हा ती आधी त्याच्या मनात तयार होत असते. नाही का?
« PreviousChapter ListNext »