संगीत प्रेमींनी हे जरूर वाचा! तुम्ही टेक्नो सेव्ही संगीत प्रेमी असाल तर कदाचित गुगलचे हे फिचर तुम्हाला माहीत असेलही पण ज्यांना माहित नसेल त्यांचेसाठी हा लेख. आज माझ्या मुलाने (atharv sonar) मला एक गुगल व्होईस सर्चचे एक अनोखे फिचर सांगितले. मोबाईल मध्ये गुगलवर आपण व्होईस सर्च करू शकतो हे आतापर्यंत प्रत्येकाला माहिती असेलच. पण, आपण जर सर्चचा माईक सुरु करून दुसऱ्या एखाद्या मोबाईल मधून कोणत्याही गाण्याची कोणतीही ओळ किंवा फक्त धून किंवा फक्त संगीत वाजवले (गाण्याचे सुरुवातीचे किंवा मधले किंवा शेवटचे!) तर गुगल लगेच आपल्याला ते गाणे/संगीत कोणते आहे हे शोधून देतं. आहे की नाही कमाल? आता तुम्ही म्हणाल की यात विशेष काय आणि याचा फायदा काय? सांगतो.