Bookstruck

माती

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

मातीच्या भांड्यात जेवण शिजवल्याने अशी पोषक तत्त्वे मिळतात ज्यामुळे प्रत्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे की मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार बरे होतात. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्व मिळतात. आणि जर मातीच्या भांड्यात जेवले तर त्याचा वेगळा स्वाद देखील मिळतो.

पाणी पिण्याच्या भांड्याच्या विषयी "भावप्रकाश ग्रंथा"मध्ये लिहिले आहे...

जलपात्रं तु ताम्रस्य तदभावे मृदो हितम्।
पवित्रं शीतलं पात्रं रचितं स्फटिकेन यत्।
काचेन रचितं तद्वत् वैङूर्यसम्भवम्।
(भावप्रकाश, पूर्वखंडः4)

अर्थात पाणी पिण्यासाठी तांबे, स्फटिक किंवा काच-पात्र वापरले पाहिजे. शक्य असेल तर वैङूर्यरत्नजडित पात्राचा उपयोग करावा. यांचा अभाव असेल तर मातीची भांडी शीतल आणि पवित्र असतात. तुटक्या फुटक्या भांड्यातून आणि अंजलीतून पाणी पिऊ नये.

« PreviousChapter List