Bookstruck

राघव चेतन आणि अल्लाउद्दिन खिलजी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
आपल्या अपमानाने नाराज होऊन राघव चेतन दिल्लीला गेला. त्याचे लक्ष्य होते दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी याला चित्तोड वर आक्रमण करण्यास उद्युक्त करणे. दिल्लीला गेल्यावर राघव चेतन दिल्लीच्या जवळ एका जंगलात थांबला जिथे सुलतान नेहमी शिकार करण्यासाठी येत असत. एक दिवस जेव्हा राघवला समजले की सुलतानाचे शिकारी दल जंगलात प्रवेश करत आहे. तेव्हा राघव चेतनने आपल्या बासरीतून माद्धुर्र स्वर काढायला सुरुवात केली.
जेव्हा राघव चेतनच्या बासरीचे स्वर सुलतानाच्या शिकारी दलापर्यंत पोचले तेव्हा ते सर्व विचार करू लागले की या घनदाट जंगलात एवढी सुंदर आणि मधुर बासरी कोण वाजवत असेल? सुलतानाने आपल्या सैनिकांना बासरी वादकाला शोधून आणायला पाठवले. जेव्हा राघव चेतनला त्या सैनिकांनी खिलजीच्या समोर प्रस्तुत केले तेव्हा सुलतानाने त्याची प्रशंसा करून त्याला आपल्या दरबारात यायला सांगितले. चलाख राघव चेतन त्या वेळी म्हणाला, "तुमच्याकडे कित्येक सुंदर वस्तू असताना तुम्ही माझ्यासारख्या संगीतकाराला कशाला बोलावत आहात?"
राघव चेतनचे बोलणे न समजल्यामुळे खिलजीने त्याला स्पष्ट बोलायला सांगितले. राघव चेतनने खिलजीला राणी पद्मिनीच्या सौंदर्याचे वर्णन केले ज्यामुळे खिलजीची वासना जागृत झाली. आपल्या राजधानीला पोचल्यावर लगेचच त्याने आपल्या सैन्याला चित्तोडवर आक्रमण करायला सांगितले कारण त्याचे स्वप्न होते त्या सौदर्यवतीला आपल्या जनानखान्यात आणून ठेवणे.
« PreviousChapter ListNext »