चंद्र
चंद्रमा " माँ (आई) " चा सूचक आहे आणि मनं चा कारक आहे. शास्त्र सांगते की "चंद्रमा मनसो जात:". याची कर्क राशी आहे. कुंडलीत चंद्र अशुभ असता मातेला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा आरोग्याला धोका असतो, दूध देणाऱ्या पशूंचा मृत्यू होऊ शकतो. स्मरणशक्ती क्षीण होते. घरात पाण्याची टंचाई निर्माण होते किंवा विहिरी, नद्या इत्यादी कोरड्या पडतात. मानसिक तणाव, मन घाबरे होणे, नाही नाही त्या शंका मनात येतात, मनात अनिश्चित भीती आणि शंका घर करून राहतात आणि सर्दी राहते. व्यक्तीच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार वारंवार येत राहतात.