भूमिका

अपयश हे आपला आत्मविश्वास डळमळीत करू शकते. ते तुमच्या मनाची अशी धारणा करून देऊ शकते की तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी लायक नाही आहात. अपयश हे तेव्हाच पदरात येतं जेव्हा तुम्ही एखादा धोका पत्करता किंवा अशी गोष्ट मिळावी पाहता जी मिळवणे अतिशय कठीण आहे. अपयशाशी दोन हात करत सफलता प्राप्त करण्यातच तुमची खरी परीक्षा आहे, आणि हे तुम्ही भूतकाळात अडकून पडलात तर कधीही करू शकणार नाही. एखादी कीमती वस्तू प्राप्त करण्यासाठी तुम्हाला टक्के-टोणपे खावे लागतील, धोका पत्करावा लागेल. तुमचे अपयाच तुमच्या योग्यतेवर डोईजड होऊ देऊ नका. जर तुम्ही नेहमी भूतकाळात अडकून पडलात तर तुमचा भूतकाळ हाच तुमचा वर्तमानकाळ बनेल, आणि तुम्ही कधीही पुढे जाऊ शकणार नाही.