Bookstruck

मिथुन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
राशी स्वरूप- स्त्री-पुरुष आलिंगनबद्ध, राशी स्वामी- बुध.
१. राशीचक्रातील ही तिसरी रास आहे. राशीचे प्रतिक युवा दाम्पत्य आहे, ही द्वि-स्वभाव वाली रास आहे.
२. मृगशिरा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणाचे स्वामी मंगल-शुक्र आहेत. मंगळ शक्ती आणि शुक्र माया आहेत.
३. या लोकांच्या मनात मायेच्या प्रती भावना आढळून येते, हे लोक जोडीदाराच्या प्रती नेहमी शक्ती बनून प्रस्तुत होतात. घरगुती कारणांमुळे अनेक वेळा आपापसात तणाव बनून राहतो.
४. मंगल आणि शुक्र यांच्या युतीमुळे जातकात स्त्री रोग पारखण्याची अद्भुत क्षमता असते.
५. या लोकांना वाहनांची चांगली जाण असते. नवनवी वाहने आणि सुख साधनांच्याकडे अत्याधिक आकर्षण असते. घरगुती सजावटीकडे कल अधिक असतो.
६. मंगळाच्या प्रभावाने हे लोक दिलेल्या शब्दाचे पक्के असतात.
७. गुरु आकाशाचा राजा आहे तर राहू हा गुरुचा शिष्य. दोघे मिळून जातकामध्ये परमेश्वरी शक्ती वाढवतात.
८. या राशीच्या लोकांमध्ये ब्रम्हांडाच्या बाबतीत माहिती करून घेण्याची योग्यता जन्मजात असते. ते वायुमान आणि उपग्रह यांच्या बाबतीत ज्ञान वाढवतात.
९. राहू शनीच्या युतीने जातकामध्ये शिक्षण आणि शक्ती उत्पादित होते. जातकाचे कार्य शिक्षणाची स्थाने, वीज, पेट्रोल, किंवा वाहनाशी संबंधित कामांच्या दिशेने राहते.
१०. जातक एका मर्यादेत राहूनच कार्य करू शकतो आणि संपूर्ण जीवन कार्याप्रमाणे फलदायक राहते. जातकामध्ये एक मर्यादा असते जी त्याला धर्मामध्ये लीन करते आणि तो सामाजिक आणि धार्मिक कार्यात स्वतःला लीन ठेवतो.
११. गुरु, जो ज्ञानाचा मालक आहे, त्याला मंगळाची साथ मिळाल्यावर उच्च पदावर आणि संरक्षण इत्यादी विभागांकडे घेऊन जाते.
१२. हे लोक आपलीच करणे, आपलेच विचार यांमुळे गोंधळात पडतात. मिथुन राशी पश्चिम दिशेचे द्योतक आहे. जे चंद्राच्या निर्णय काळात जन्म घेतात ते मिथुन राशीचे असतात.
१३. भ्धाचा धातू पारा आहे आणि त्याचा स्वभाव थोड्या गरमी-थंडीने वर खाली होणारा आहे. या राशीच्या लोकांमध्ये दुसऱ्याचे मन ओळखणे, दूरदृष्टी, बहुमुखी प्रतिभा, अधिक चातुर्याने कार्य करण्याची क्षमता असते.
१४. या लोकांना बुद्धिवादी कामांमध्येच यश मिळते. अंगभूत बुद्धी आणि वाणीचे चातुर्य यांच्या जोरावर या राशीचे लोक कुशल कुटनीतीज्ञ आणि राजकारणी बनू शकतात.
१५. प्रत्युएक कार्यात जिज्ञासा आणि संशोधक बुद्धी असल्यामुळे या राशीचे लोक अन्वेषणात देखील यश प्राप्त करतात आणि पत्रकार, लेखक, बातमीदार, भाषांचे जाणकार, योजनाकार देखील बनू शकतात.
« PreviousChapter ListNext »