Bookstruck

धनु

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
राशी स्वरूप- धनुर्धारी, राशी स्वामी - गुरु.
१. धनु ही द्वी-स्वभाव वाली रास आहे. राशीचे चिन्ह धनुर्धारी आहे. ही रस दक्षिण दिशेचे द्योतक आहे.
२. धनु राशीवाले लोक खुल्या विचारांचे असतात. जीवनाचा अर्थ यांना चांगल्या प्रकारे कळतो.
३. दुसऱ्याच्या बाबतीत माहिती करून घेण्याचा नेहमी प्रयत्न करतात.
४. यांना रोमांच फार आवडतो. हे बेडर आणि आत्मविश्वासी असतात. अतिशय स्पष्टवक्ते आणि महत्त्वाकांक्षी असतात.
५. स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा दुसऱ्याचे मन दुखावतात.
६. त्यांच्या मते ज्याची त्यांनी पारख केली आहे, तेच सत्य आहे. तेव्हा यांना मित्र कमी. धार्मिक विचारप्रवाहापासून हे दूर असतात.
७. या राशीची मुले मध्यम बांध्याची असतात. केस भुरे आणि डोळे मोठे असतात. यांच्यात धैर्याची कमी असते.
८. यांना मेक अप करणाऱ्या मुली जास्त आवडतात. तांबूस आणि पिवळा रंग आवडतो.
९. आपले शिक्षण आणि करिअर यांच्यामुळे आपला जोडीदार आणि वैवाहिक जीवनाची उपेक्षा करतात. पत्नीला तक्रारीला जागा देत नाहीत आणि घरगुती जीवनाचे महत्त्व जाणतात.
१०. धनु राशीच्या मुली लांब ढंगानि चालणाऱ्या असतात. सहजपणे कोणाशीही मैत्री करत नाहीत.
११. या चांगल्या श्रोत्या असतात आणि यांना खुले, इमानदार व्यवहाराची मनसे आवडतात. या राशीच्या स्त्रिया गृहिणी बनण्यापेक्षा करिअर चांगले घडवू इच्छितात.
१२. यांच्या जीवनात भौतिक सुखांची महत्ता असते. सामान्यतः सुखी आणि संपन्न जीवन व्यतीत करतात.
१३. या राशीचे लोक बहुतेक करून आपल्या विचारांचा विस्तार करत नाहीत आणि बहुतेक वेळा गोंधळलेले राहतात. कोणत्याही एका निर्णयावर येण्यासाठी यांना वेळ लागतो. आणि हा वेळ अनेक वेळा नुकसानकारक देखील ठरते.
१४. बहुतेक वेळा हे लोक दुसर्यांच्या आयुष्यात दाखल देत नाहीत आणि आपल्या कामाशी संबंध ठेवतात.
१५. यांचे पूर्ण आयुष्य जवळ जवळ मेहनत करून कमावण्यात जाते किंवा हे आपले वडिलार्जित काम पुढे नेतात.

« PreviousChapter ListNext »