Bookstruck

शापित इटालियन आयलंड

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



इटली मधील आईसोला ला गैओला बेट शापित मानले जाते. शापित अशासाठी की या बेटाच्या सर्व मालकांचा कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यू झाला किंवा त्यांना भारी प्रमाणात नुकसान तरी सोसावे लागले. १९२० मध्ये स्विस ओनर हेन्स ब्राऊन चा अचानक मृत्यू झाला आणि त्याचे शव एका कारपेट मध्ये गुंडाळलेले मिळाले. याच प्रकारे जर्मनीच्या ओटो ग्रूनबैक चा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला. या बेटाचे अन्य मालक जे इंडस्ट्रीयलिस्ट होते, त्यांनी स्वित्झर्लंड मध्ये मेंटल हॉस्पिटल मध्ये आत्महत्या केली. अब्जाधीश पॉल गेटी यांनी हे बेट विकत घेतले तर त्यांच्या नातवाचे अपहरण झाले. तर या बेटाचे शेवटचे खरेदीदार - त्यांना विम्यामध्ये फ्रॉड केल्याच्या आरोपावरून तुरुंगात पाठवले गेले.

« PreviousChapter ListNext »