Bookstruck

ब्राझिल मधील स्नेक आयलंड

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


इलहा डी क्विमाडा ग्रांड चे टोपणनाव स्नेक आयलंड देखील आहे. हा ब्राझिलच्या साओ पावलो द्वीपाचा तट आहे. या ठिकाणाला गोल्डन लान्सहेड जातीच्या सापांचे घर मानले जाते. इथे सापांची संख्या एवढी जास्त आहे की प्रत्येक वर्ग मीटर मध्ये ५ साप राहतात, म्हणजेच आपल्या सिंगल बेड एवढ्या जागेत दहा साप आणि डबल बेड एवढ्या जागेत वीस साप! जगातील सर्वांत विषारी सापांच्या यादीत या सापाचे नाव समाविष्ट आहे. या गोष्टीचा अंदाज आपल्याला यावरून येईल की या सापाच्या दंशाने माणसाचा १० ते १५ मिनिटांत मृत्यू होतो. संपूर्ण न्राझील मध्ये होणाऱ्या सर्पदंशाच्या मृत्यूंपैकी ९०% मृत्यूंसाठी हाच साप जबाबदार आहे. सध्या ब्राझील च्या नेव्ही ने लोकांना या ठिकाणी प्रवेश करण्यास मज्जाव केलेला आहे. 

« PreviousChapter ListNext »