Bookstruck

केव्हा केली जात असे ही जादू

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
विशेषज्ञ असे मानतात की पुतळ्याच्या माध्यमातून कोणा माणसाला त्रास देणे हा या जादूचा उद्देश नाही. या जादूसाठी काळी जादू हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. प्रत्यक्षात हा एक तंत्राचा विधी आहे. जो भगवान शंकराने आपल्या भक्तांना दिला होता. प्राचीन काळी या प्रकारचा पुतळा तयार करून त्याचा उपयोग फक्त दूर अंतरावरील रोग्यावर उपचार करणे आणि त्याचा त्रास दूर करणे यासाठी केला जात असे. त्या पुतळ्यावर रोग्याचा केस बांधून विशेष मंत्रांनी त्याच्या नावाने जागृत केले जात असे. त्यानंतर रोग्याच्या शरीराच्या ज्या भागात त्रास असेल किंवा रोग असेल, पुतळ्याच्या त्याच भागात सुई घुसवून विशेषज्ञ आपली सकारात्मक उर्जा तिथपर्यंत पोचवत असे. काही वेळेपर्यंत असे केल्याने त्रास दूर होत असे. हेच कारण आहे की याला रेकी आणि एक्युप्रेशर यांचे मिश्रण देखील म्हणता येईल. ज्यामध्ये आपल्या अध्यात्मिक उर्जेच्या सहाय्याने एखाद्याला जीवनदान करता येईल.

« PreviousChapter ListNext »