Bookstruck

सिंहासन बत्तिशीची कथा क्रं.19 (मन श्रेष्ठ की ज्ञान?)

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

राजा विक्रमादित्य यांच्या दरबारारात जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधान होत असे. एके दिवशी दोन तपस्वी दरबारात आले. त्यांनी राजा विक्रमाला आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची विनंती केली. त्यातील एकाच्या मते मनुष्याचे मन त्याच्या सगळ्या क्रियांवर नियंत्रण ठेवत असून तो मनाविरुध्द काहीच करू शकत नाही. मात्र दुसरा तपस्वी त्याच्याशी असहमत होता. त्याच्या मते मनुष्याचे ज्ञान त्याच्या क्रियांवर नियंत्रण ठेवत असते. मन हे देखील ज्ञानाचे दास आहे.

राजा विक्रमादित्यने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्याकडून काही मुदत मागून घेतली. ते गेल्यानंतर राजा विचारात पडला. 'मन श्रेष्ठ की ज्ञान?' याचे राजाला उत्तर सापडत नव्हते. अशा अडलेल्या प्रश्नांची उत्तरे राजा जनतेमध्ये जाऊन सोडवत असे. राजाने वेश बदलून राज्यात हिंडू लागला. एके दिवशी राजाचे लक्ष एक गरीब तरुणावर गेले. तो एक झाडाखाली बसला होता.

राजा त्याच्याजवळ गेला. तो राजाचा मित्र सेठ गोपालदास यांचा लहान मुलगा होता. गोपालदास यांनी‍ खुप धन कमावले होते. मात्र त्याचा मुलगा भिख मागत असल्याने राजाला वाईट वाटले. त्यामाग‍ील कारण जाणून घेण्याचा राजाने प्रयत्न केला. गोपालदासने मरते वेळी आपले सारे धन त्याच्या दोन मुलांमध्ये समान वाटून दिले होते. गोपालदासकडे खूप धन होते.

गोपालदासचा लहान मुलगा व्यसनाधीन झाला होता. सारे धन तो जुगारात हरला होता. राजाने त्याला प्रश्न केला की, त्याकडे धन आले तर तो काय करेल? त्यावर त्याने उत्तर दिले ज्ञानाच्या जोरावर मनावर नियंत्रण राखेल. व चांगल्या पध्दतीने व्यापार करेल.

राजा विक्रमने त्याला स्वत:चा परिचय करून दिला. व त्याला खूप सुवर्ण मोहरा दिल्या. उत्तम पध्तीने व्यापार करण्‍याचा सल्ला दिला.

काही दिवसातच ते दोन तपस्वी दरबारात हजर झाले. तेव्हा राजा म्हणाला, मनुष्याच्या शरीरावर त्याचे मन वारं वारं नियंत्रण करण्‍याची चेष्टा करत असते. परंतु ज्ञानाच्या बलावर विवेकशील मनुष्याचे मन आपल्यावर हावी होऊ देत नाही.

मन व ज्ञान यांचे परस्परांशी संबंध असून त्यांचे प्रत्येकाचे महत्त्व आहे. ज्याच्यावर मनाचे नियंत्रण असते त्याचा सर्वनाश अवश्य आहे. मन जर रथ आहे तर ज्ञान सारथी आहे. विना सारथीच्या रथ अपूर्ण आहे. असे सांगितले. नंतर राजाने शेटच्या मुलांची कथा त्या दोन तपस्वींना सांगितली.

« PreviousChapter List