काळी जादू

काळी जादू तिला म्हणतात जिच्या माध्यमातून व्यक्ती आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी दुसऱ्याला नुकसान करण्याचे काम करते. बंगाल आणि आसाम यांना काळ्या जादूचा बालेकिल्ला मानले जाते. काळ्या जादूच्या माध्यमातून कोणाला जनावर बनवून कैद केले जाते किंवा कोणाला तरी वश करून त्याच्याकडून आपल्याला हवे तसे कार्य करून घेता येऊ शकते. काळ्या जादूच्या माध्यमातून कोणालाही कोणत्याही प्रकारच्या भ्रमात टाकता येऊ शकते आणि एखाद्याला मारून देखील टाकता येते.