पाणी शोधणे किंवा हरवलेली वस्तू शोधण्याची विद्या

पाणी शोधणारे सगुणी आपल्याला भारतात आढळून येतात. ते कडूनिंबाची फांदी, धातूची वळलेली छडी, लोलक इत्यादी वस्तूंचा उपयोग करून पाण्याच्या उपस्तिथीची माहिती देतात. आश्चर्याची गोष्ट अशी की हे अनेक वेळा खरे सिद्ध झालेले आहे आणि प्रशिक्षित भूवैज्ञानिकांना देखील त्यांनी मात दिलेली नाहे. काही सगुणी असा देखील दावा करतात की ते सांगू शकतात की पाणी  खारे आहे को गोड आहे तसेच ते वाहते आहे की स्थिर आहे. त्याचप्रकारे काही असे लोक आहेत जे डोळे बंद करून कोणत्याही हरवलेल्या वस्तूचा पत्ता सांगतात. हे काम ते आत्मसंमोहनाच्या माध्यमातून करतात. हेच काम आजकाल पेंडुलम डाउजिंगच्या माध्यमातून देखील केले जाते.