Bookstruck

दृष्ट काढणे व इतर अंधश्रद्धा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पूर्वी आपली आजी किवा आई, आपल्याला काही झालं की ..किंवा शुभकार्यानंतर दृष्ट काढायची, आठवतं..? तेजोवलय स्वच्छ किंवा शुद्ध करण्याचाच तो प्रकार आहे. मीठ आणि मोहोरी या दोन्हीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद आहे.

तसेच बाहेरून घरी आल्यावर चप्पल घराबाहेर काढून बाहेरच विहिरीवर डोक्यावरुन आंघोळ करून मग घरात यायचं अशी पद्धत होती.. त्यांचं कारण लक्षात आलं..? 

बाहेरील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल तेजोवलय शुद्ध रहावं..  जेवायच्या आधी जेवणाच्या ताटाला नमस्कार करून एखादा श्लोक म्हणून जेवायची पद्धत.  जेणेकरून जेवण बनवणाऱ्याची नकारात्मक विचारस्पंदन निघून जावीत.  

या खूप लहान गोष्टी आहेत पण तेजोवलय शुद्ध ठेवायला खूप मदत करतात.आता सुद्धा आपण यातलं जेवढं पाळता येईल तेवढं पाळायचं.

« PreviousChapter ListNext »