Bookstruck

वनदेवीचा पाळणा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बाळा जो जो रेऽऽऽ

पापणिच्या पंखांत झोंपु दे डोळ्यांची पाखरे !

झोंपी गेल्या चिमण्या राघु

चिमण्या राजा नकोस जागूं

हिरव्या पानांवरील झोंपलीं वेलींचीं लेंकरें !

पुरे खेळणें आतां बाळा

थांबव चाळा , थांबव बाळा

शब्द ऎकतें झोंपेमधुनी चाळवतें बा रे !

मेघ पांढरे उशार घेउनी

चंद्र तारका निजल्या गगनीं

वनदेवींनी उघडीं केलीं स्वप्नांची मंदिरे !

बाळा जो जो रेऽऽऽ

« PreviousChapter ListNext »