Bookstruck

पाळणा - जो जो रे जो जो श्रीकृष्ण ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जो जो रे जो जो श्रीकृष्ण बाळा । पालखीं निद्रा करिं घननीळा ॥धृ०॥

श्रावणमासीं कृष्णाष्‍टमीसी, देवकियासी ये जन्मासी ॥१॥

कंसभये तो वसुदेव बाळा, नेउन गोकुळीं ठेवि तयाला ॥२॥

मध मुखीं घालुनी मधुसूदनासी, नंद बघे निज सुत वदनासी ॥३॥

गर्गमुनींनीं जातक केलें, दुसरे दिवशीं हेलकरी आले ॥४॥

तिसरे दिवशीं माय उसंगा, घेउनि पान्हा पाजी श्रीरंगा ॥५॥

चवथे दिवशीं साखर-पेढे, वांटिले नगरीं बहु भरुनी गाडे ॥६॥

पांचवे दिवशीं पंचमी-पूजा, बाळ-बाळंती रक्षावळी जा ॥७॥

सहावे दिवशीं सटवीचा फेरा, लिहीतसे भाळीं गोरस चोरा ॥८॥

सातवे दिवशीं यें सप्तऋषि, रक्षाबंधनें बांधीती ध्याती ॥९॥

आठवे दिवशीं आठी वाणें, दिधलीं नंदाने गो-भू-दानें ॥१०॥

नववे दिवशीं नौबत वाजे हेलकर्‍या ईनाम दिले नंदबाजे ॥११॥

दहावे दिवशीं निवणे करा हो, सुईणीची मोत्यानें ओटी भरा हो ॥१२॥

ऋतुवती नारी बळी रामा घेती त्या योगें त्यांना होत संतती ॥१३॥

बारावे दिवशीं बारसें झालें, परब्रह्म श्रीकृष्ण पालखीं निजले ॥१४॥

वर्णन करिती हरिनामकरण उद्धरी कृष्णा धरि कृष्णचरण ॥१५॥

« PreviousChapter ListNext »