Bookstruck

लावणी १६४ वी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
तुमची खोड मोठी दोड मला सोड की रे ॥धृ०॥

घट्केंतुन नौ रंग । पाण्यावर जसा तो तरंग । याच्या काळजीने झालें रोड रे ॥१॥

घडोघडीं कुच धरितां । रात्रींतुन कितींदा छळितां ? । कां करितां मशीं उरफोड रे ? ॥२॥

एक वरीष दम धरा । न्हाण येऊं द्या मला जरा । मग मशीं स्नेह करा गोड रे ॥३॥

विषय डोम पाजळला । पतंग ज्योती पाजळल्या । रामा म्हणे अमृत रस गोड रे ॥४॥

« PreviousChapter ListNext »