Bookstruck

अपहरण ४

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
तीन दिवस उलटून गेले, तरी प्रकाशचा काही केल्या शोध लागत नव्हता. एकीकडे वसंतराव आणि त्यांचे कुटुंब तर दुसरीकडे खासदार मोहनराव, प्रकाशच्या शोधासाठी पोलिसांना वारंवार फोन करून आणि भेटून हैराण करत होते. तसे बघायला गेलो तर त्यात वसंतरावांचे काहीच चुकत नव्हते. प्रकाश त्यांचा मुलगा होता. पण खासदार मोहनरावांच्या या प्रकरणात नाक खूपसण्यामुळे पोलिस अस्वस्थ होते. आणि आश्चर्यचकीतही. पोलिसांच्या मनात विविध प्रश्नांची पाल चुकचुकत होती. पण खासदार साहेबांना त्याबद्दल विचारण्याचे धाडस मात्र त्यांच्यात नव्हते.

गेल्या तीन दिवसांपासून वसंतराव कामाला गेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या ऑफिसमधून सारखे फोन येत होते. ‘वसंतरावांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला आणि तीन दिवस उलटूनही त्याचा अजून शोध लागलेला नाही’ ही बातमी त्यांच्या ओळखीच्या जवळ-जवळ सर्वांनाच  लोकांना समजली होती. त्यामुळे त्यांचे सुद्धा वसंतरावांच्या घरी वारंवार फोन येत होते. प्रत्येकाला तेच-तेच सांगून आणि त्याच-त्याच गोष्टींची चर्चा करुन, त्यांचे कुटुंब आता कंटाळले तर होतेच परंतु यासर्व गोष्टींचा वारंवार विचार करुन संपूर्ण कुटुंबावर मानसिक  तणावाचे सवट निर्माण झाले होते.
« PreviousChapter ListNext »