Bookstruck

नागांची रहस्ये २

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
"हजारो वर्षापूर्वी नागांच्या पूर्वजांमध्ये आणि मनुष्याच्या पूर्वजांमध्ये झालेल्या करारामुळे त्यांचा पृथ्वीवरील प्रवेश निषिद्ध झाला होता. त्यामुळे लाखो वर्ष पृथ्वीवर वास्तव्य करणाऱ्या नागांचा आणि पृथ्वीचा संबंध आता संपुष्टात आला होता. त्यानंतर नागांचे वास्तव्य फक्त पाताळातील नागलोकापुरतेच मर्यादित झाले."

"नागांकडे अलौकिक शक्ती असल्यामुळे त्यांचे पृथ्वीवरील वास्तव्य मनुष्यासाठी धोक्याचे होते. गरुडांबरोबर झालेल्या युद्धानंतर जीवित असलेल्या उरल्या सुरल्या नागांनाही पृथ्वीवरुन हाकलुन दिले नाही तर, भविष्यामध्ये ते आपल्याशी पुन्हा युद्धे करतील आणि पुन्हा आपल्याला त्यांचे गुलाम करतील त्यामुळे नागांसमोर आपला टिकाव लागणार नाही, हे मनुष्याने आता ओळखले होते. त्यामुळे बुद्धीमान मनुष्याने त्यांना पाताळात जाण्यास प्रवृत्त केले."

"जर नागांनी पाताळात वास्तव्य केले, तर ते गरुडांपासून स्वतःला सुरक्षित ठेऊ शकतील. त्याचप्रमाणे तिथे त्यांचे स्वतंत्र राज्य असेल. ज्याठिकाणी फक्त नागच इतर नागांवर सत्ता स्थापन करु शकतील हे मनुष्याने नाग प्रजातीला पटवून दिले. आणि सत्तेचे आमिष दाखवून मनुष्याने नागांच्या राजाकडून पृथ्वीवर परत कधीही न येण्याचे वचन घेतले."
« PreviousChapter ListNext »