Bookstruck

कोणी लिहिले?

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

युद्धाच्या समाप्तीनंतर कौरव−पांडवांचे पितामह कृष्णद्वैपायन व्यासमुनी यांनी तीन वर्षे ग्रंथलेखनाची तपश्चर्या करीत ही युद्धकथा लिहून पुरी केली. व्यासमुनींनी श्लोक रचून ती कथा गणपतीला सांगितली आणि गणपती ह्या देवाने ती लिहून पुरी केली. या ग्रंथाला जय, भारत आणि महाभारत अशा तीन संज्ञा दिलेल्या ग्रंथातच आढळतात. या ग्रंथाच्या प्रारंभी जो मंगलाचरणाचा श्लोक आहे त्यातच या ग्रंथाचे जय हे नाव आले आहे.


नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।

देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ।।

नारायण आणि त्याचप्रमाणे नरोत्तम नर यांना तसेच देवी सरस्वतीला नमस्कार करून त्यानंतर जय ग्रंथाचे पठन करावे’.

« PreviousChapter ListNext »