पटवर्धन घराणे
पेशवाईतील एक निष्ठावंत व कर्तबगार घराणे म्हणून पटवर्धन घराणे ओळखले जाते. हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवड गावचे होय. या घराण्याचे मूळ पुरुष हरिभट पटवर्धन. त्यान कृष्ण, बाळ, त्रिंवक, गोविंद, रामचंद्र, माधव य भारकर असे सात मुलगे होते. त्यांपैकी त्रिंबक, गोविंद व रामचंद्र हे प्रसिद्धीस आले.