Bookstruck

जंबुद्वीप किंवा कुमारीद्वीप

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बौद्ध ग्रंथांमध्ये भारतास जंबुद्वीप अर्थात  जंबू वृक्षांचा म्हणजे गुलाबी जांब असलेला खड म्हटल्याचे आढळते. तथापि जंबुद्वीप हा एक मोठा भूप्रदेश असून त्याचा एक भाग म्हणजे भारत होय.

पुराणातील उल्लेखानुसार भारत हा जंबुद्वीपाचा एक भाग असून तो नवखंडांत विभागलेला आहे. ही विभागणी गुप्तकाळात झाली असून याच काळात भारतीय संस्कृती, भाषा, धर्म, साहित्य यांचा विस्तार पूर्वेकडील बेटांतही झाला.

भारताला पुराणात कुमारीद्वीप म्हटले असून भारताच्या दक्षिणेकडील कन्याकुमारी या देवीवरून ते पडलेले असावे. बृहत्तर भारतातील लोक मूळ भारताला कुमारीद्वीप या नावाने ओळखत असावेत. 

 
« PreviousChapter ListNext »