Bookstruck

पाकिस्तानी मराठ्यांच्या जाती उपजाती

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


अब्दालीला मिळालेले बलुची सैन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींचे मिळून बनलेले होते. अहमदशहा अब्दालीकडून मिळालेले मराठा युद्धकैदी मीर नासीर खानने या सैन्यामध्ये वाटून दिले. मराठा युद्धकैद्यांची संख्या तब्बल २२ हजार सांगितली जाते. म्हणजेच ते संख्येने खूप मोठे होते, त्यामुळे त्यांना एकत्र ठेवणं हाही एक धोका होता. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन मराठा युद्धकैद्यांनी वेगवेगळ्या बलुची जमातींमध्ये वाटणी करण्यात आली. बुगटी, र्मी, मझारी, रायसानी, गुरचानी अशी काही उपजातींची नावं आहेत. या उपजातींचे मराठा युद्धकैदी आता याच नावाने ओळखले जातात. उदा. बुगटी मराठा

 

« PreviousChapter ListNext »