प्रेम आणि विश्वास

प्रेम आणि विश्वास यांची पूर्ण खात्री पटवणारी ती घटना. आमच्या लग्नाच्या आधीची. त्याकाळी मी शिक्षणाकरता पुण्याला राहत असे. दर शुक्रवारी संध्याकाळी मी मुंबईला येत असे व सोमवारी सकाळी पुण्याला परत जात असे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस मी सगळा वेळ 'ह्यांच्या'बरोबर घालवत असे. कधी ते आमच्या घरी येत तर कधी मी त्यांच्या घरी जायची. कधीतरी दोघे मिळून आम्ही कुठेतरी बाहेरही जायचो.