पंगिरा

"पंगिरा " विश्वास पाटील यांची ग्रामीण भाषेतली, ग्रामीण जीवनाविषयी लिहली कादंबरी. तसी मला विश्वास पाटील यांची ओळख नवीन नाही. शालेय जीवनात मराठीच्या पाठा पासून त्यांची ओळख झाली. नंतर "पानिपत"व "महानायक" वाचल्यावर खात्री पटली की विश्वास पाटील म्हणजे इतिहास विषयक मोठे लेखक पण "पंगिरा"वाचल्यावर मात्र माझा सर्व कयास मोडीस निघाला.