अप्रूप

परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो ... फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं...... वर लिहिलं होतं .. “हरवले सापडले विभाग” ..... तीच पूर्वीची जागा ..  कपाटही तेच असावं बहुधा .... पण आज ते खूपच खिन्न वाटत होतं .... सुरवातीला वाटलं की कपाटाच्या वयोमानामुळे असेल ... पण नंतर नजर त्या कपाटातल्या वस्तूंवर गेली आणि मग त्याची उद्विग्नता नेमकी कशामुळे होती याचा अंदाज आला ... आत इतक्या वेगवेगळ्या महागड्या वस्तू  , Tupper ware च्या बाटल्या , रुमाल , चित्रकलेच्या वस्तू ,  पेनं , key chains, कंपास , पेन्सीलचा तर खचंच पडला होता ....... शाळेतल्या बाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या, आज काल मुलं आपली वस्तू हरवली की विचारतच नाहीत .