कळीचा नारद

सदाशिवराव आणि माधवराव दोघांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चुरस लागली होती .सदाशिवराव आणि माधवराव एकेकाळचे एकमेकांचे मित्र पण दोघांचीही जशी जशी प्रगती झाली तशी  त्यांच्यामध्ये इगो निर्माण झाला.व दुरावा आला .सदाशिवरावांचा स्वभाव तोंडावर पटकन बोलून दाखवणे व जे मनात आले ते बोलून दाखवणे राग आला तर लगेच व्यक्त करणे असा होता .त्यांच्या अशा स्वभावामुळे बरेच लोक त्यांना तापड स्वभावाचा मनायचे व बरेच जण दुरावले गेले होते .या उलट माधवरावांचा स्वभाव होता कधीही कुणाला काही मनायचा नाही, आपल्याला एखादी गोष्ट साध्य करून घ्यायचे असेल तर, तिसऱ्या माणसाला चुनकून देणे ,किंवा दुसऱ्याला भडकून देऊन आपलेे ईप्सित साध्य करायचे आहे ते साध्य करणे बैठकीमध्ये चारचौघांमध्ये काहीच न बोलता बैठक झाल्यावर आपल्याला जसे पाहिजे तसे त्या बैठकीचे विश्लेषण करणे व आपल्या  विरोधकांना बदनाम करून आपण कसे या सर्व गोष्टींपासून अलिप्त आहोत ,असे दाखवणे   माधवरावांचे एक वाक्य होते  , काट्याने काटा काढावा लागतो..........