Bookstruck

संग्रह १

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

सूपभर सुपारी निवडू कशी,
गळ्यात माळ वाकु कशी,
पायात पैंजण चालू कशी,
........ बसले मित्रपाशी,
कपाटाची चावी मागू कशी...??

लाल मणी तोडले; काले मणी जोडले,
---रावांसाठी मी माहेर सोडले.

मराठी भाषा महाराष्टाचि अस्मिता
...चे नाव घेते ...चि चारुता

अत्तराचा सुगंध दरवऴ्ला चहुकडे
..रावांच्या नावाचा लौकिक होउ दे सगळिकडे

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
......रावाच नाव घेते पत्नि या नात्याने.

अबोलीच्या फुलाचा गंध काहि कळेना
---चे नाव घेण्यास शब्द काहि जुळेना

Chapter ListNext »