Bookstruck

AI पासून मानवजातीला धोका आहे का ?

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एलोन मस्क आणि इतर काही लोकांनी AI मानवजाती साठी धोका ठरू शकते असे व्यक्तव्य केले आहे पण त्यांत काही तथ्य आहे का ? २०१७ मध्ये तरी ह्या प्रहसनचे उत्तर नकारार्थी आहे. संगणक फार प्रगत झाले असले तरी एका ५ वर्षांच्या मुलं इतकी सुद्धा मानवी बुद्धी त्यांच्याकडे नाही. संगणक एक विशिष्ट गोष्ट माणसापेक्षा चांगली करू शकतो उदाहरणार्थ लक्षावधी फोटो पाहून तो त्याची कुठल्या फोटोत आपला चेहरा आहे सांगू शकतो पण त्याच संगणकाला इतर कुठलेही काम काळत नाही त्याशिवाय स्वयं प्रेरणा नावाची गोष्टी सुद्धा त्यांच्यांत नाही. 

मानवजात जशी प्रगत होत जाईल तशी AI वरील आपली निर्भरता वाढत जाईल. अमेरिके सारख्या देशां पुढील २० वर्षांत "ड्रायवर" हा प्रकार नाहीसा होईल आणि गाडी स्वतः तुम्हाला फारवेळ पण त्याच वेळी ती गाडी स्वयं प्रेरणेने तुम्हाला ठार मारायचा प्रयत्न करील का ? तसे करण्यासाठी गाडीला तास विचार करावा लागेल आणि अजून तरी संगणक जे शिकवले आहे ते सोडून इतर काम स्वयं प्रेरणेने करू शकत नाही. 

लष्कर आणि आतंकवादी सुद्धा AI चा वापर करू लागतील. त्यांत शत्रूला ओळखाउन नष्ट करणारी कृत्रिम बुध्दीत्मतेवर आधारित यंत्रणा उभी केली जाईल. कदाचित हि यंत्रणा हॅक करून मानवाला अपाय होऊ शकतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त माणसाने घाबरून जावे अश्या प्रकारची बुद्धी असलेली मशीन मानवाने अजून बनवलेली नाही. 

« PreviousChapter ListNext »