Bookstruck

सखे पाहिले जेव्हा तुला….. !!

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

सखे पाहिले जेव्हा तुला

मी गालातल्या गालात हसलो होतो

आणि असलो जरी साधा सरळ

तेव्हापासून बिघडलो होतो

रात्रंदिवस तुझाच विचार

चेहरा तुझा आठवत होता

आणि मित्रही मला आता

तुझ्या नावाने चिडवत होता

चाफेकळी ओठ तुझे

डोळेही करती अदा

डौलदार चालीवर तुझ्या मी

झालो होतो फिदा

वाटले सांगावे सगळ मनातल

तुला एकांतात भेटून

लग्नाच तुझ्या कळताच

कंठ आला माझा दाटून

इतकं प्रेम करूनही

नशीब असं कसं घडलं

तू कधीच नव्हती माझी म्हणून

मन माझं रात्रभर रडलं

-    मुकुंद निळकंठ कुलथे







Chapter ListNext »