Bookstruck

आशा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


व्यापात या साऱ्या

जगणे मी विसरलो

ना कधी हसलो

ना कधी रडलो...

कामात रमताना

भावना बोथट झाल्या

का कळेना कधी

मलाच मी दुरावले...

ना समजली कधी

किंमत ती नात्यांची

एकटाच विहरताना

मदिरा प्राण झाली...

प्याल्यात त्या मी

बुडविला एकटेपणा

रिचवूनी मग त्याला

पोटात दवडिले...

पाहतो वाट आता

सुखस्वप्नांची

विसरुनी आज

किंमत भावनांची...


« PreviousChapter ListNext »