Bookstruck

भारताची दिगंत कीर्ति 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''पंढरी, भारताची मान खालीं झाली रे.'' आई म्हणाली.
''महान् यज्ञांतून महान् वैभव येईल. आई, अशी समजूत आहे कीं मोठा पूल बांधतांना माणसाचा बळी देत. म्हणजे तो पूल पडत नसे. आपण स्वातंत्र्याची इमारत बांधीत आहोत. हिंदुस्थान, पाकिस्तान दोघांत ऐक्याचा पूल रहावा, तो मोडूं नये म्हणून का महात्माजींचें बलिदान झालें ? त्यांच्या त्रिभुवनमोल रक्तावर स्वातंत्र्य उभारलें जाईल, ऐक्य उभारलें जाईल, पूल बांधला जाईल. अभंग पूल. आई, रडूं नकोस.''

''काश्मीरमध्यें युध्द आहे. आणि हा निजाम ऐकत नाहीं. ते रझाकार का पशु आहेत ?''

''आई, मनुष्य पापानें आधीं जळतो. कंस पापानें आधीं मेला. मग भगवान् निमित्त. रझाकार पापानें मरतील. निमित्तमात्र व्हावें लागेल. स्वातंत्र्यासाठीं कोठें तरी कोणाला किंमत द्यावीच लागणार. जगांत फुकट कांही नाहीं.''

***** (पान नं. १६४ व १६५ नाही आहे) *****

''आई, भारताच्या त्या पुण्यपुरुषाला, महात्माजींच्या वारसदाराला, उदात्त भूमिकेवरुन जाणार्‍या महान् नेत्याला नमस्कार करुन येतें.''

''ये बेटा.''
नयना हिंदुस्थानच्या राजधानींत आली. पंडितजींस भेटली. तिनें प्रणाम केला. त्यांनी मस्तकावर मंगल हात ठेवला.

''आतां स्वतंत्र हिंदुस्थानांत दारिद्र्य कोणाच्या विकासाच्या आड येणार नाहीं. किती शास्त्रीय बुध्दि, कलात्मक बुध्दि गेल्या शेंदोनशें वर्षात मातींत गेली असेल. नयना, तूं थोर पुरुषाची, महान् कलावंताची पत्नी. तुला प्रणाम.''

''ही माझी भेट. ही पार्लमेंटांत लावा.''
''अद्भूत चित्र'' थोड्या वेळानें तो गंभीर पुरुष म्हणाला.
''भारतकलाधाम उघडायला तुम्ही याल ?''
''बेटी. कामाचे डोंगर आहेत. हैदराबादचा प्रश्न कठीण होत आहे.''
''होय. आम्ही तुमचीं मुलें.''
''मी कळवीन.''

« PreviousChapter ListNext »