Bookstruck
Cover of Trust

Trust

by bharatichopade0@gmail.com

एक दिवस "प्रशांत" कामावरून घरी येतो, "प्रियंका" झोपलेली असते ... तिच्या पोटात दुखत असते ... ती प्रशांतला सांगायचा प्रयत्न करते ... पण त्याचे मन दुसऱ्या कामात असते ... त्याची आई स्वयंपाक करता करता त्याला बोलते .. "मलाच स्वयंपाक करायचा होता, तर बायको कशाला केली, तिला कसला कंटाला येतो ... बाकीच्या बायका नौकरीवरून आल्यावर काम करतच नाही का ??? "आईचे बोलणे ऐकून प्रशांत रागात प्रियंकाला उठवतो आणि स्वयंपाक करायला लावतो तिचा एकही शब्द ऐकून न घेता म्हणतो, पोटदुखल्याने माणूस मरत नाही "। त्याची आई आऩंदी असते, "याला म्हणतात खरा पुरूष"। प्रियंका ढसाढसा रडते पण स्वयंपाक करते 7-8 लोकांचा आणि सगळे काम करून झोपी जाते ... जेवन न करता, प्रशांतच्या मनात राग असतो .. म्हणून तो तिच्याशी काहीच बोलत नाही, ती हुंदके देऊन रडत असते, आणि प्रशांत कानात बोळे टाकून झोपी जातो व म्हणतो, "कायसारख छोट्या छोट्या गोष्टीला रडू येत तू जा बाई एकदाचीच निघून जा माझ्या जिवनातून ... "प्रियंका रडता रडता एक जोराचा हुंदका देते आणि शांत होते, बर झाल एकदाची झोपली, आता मला शांत झोप येईल .. सकाळी बराच वेळ झालेला असतो। पण ती काही ऊठत नाही, प्रशांत रूम मधून बाहेर येतो .. त्याच्या आईची बडबड सुरूच असते, पण आता प्रशांत आईला समजवायचा प्रयत्न करतो "अग आई तिला खरच बर नसेल, रोज सगळ करून जाते ना ती। शेवटी बायकोचाच झालास ना, आता आमच कशाला ऐकशील, आईकडे दुर्लक्ष करून प्रशांत रूम मधे जातो प्रियंकाला प्रेमाने हाक मारतो। 3-4 दा पण ती काही ऊठत नाही ... तो तिला हलवतो तेव्हा त्याला जाणवते की ती एकदम गार पडली आहे आणि त्याला देत नाहीये प्रतिक्रिया। तो लगेच तिला दवाखान्यात नेतो, डॉक्टर तिला मृत सांगतात प्रशांतला हादरा बसतो। #reports आल्यावर डॉक्टर सांगतात की, #ulcer फुटल्यामुळे तिचा मृत्यु झाला। तुम्ही जर लगेच काल आनलं असत तर ती वाचली असती #body मध्ये #poision पसरल्यामुळे रात्री 11:30 ला तिचा मृत्यु झाला। प्रशांतला तिचा शेवटचा हुंदका आठवतो आणि तो रडायला लागतो त्याला स्वतःचा राग येतो। प्रियंका सगळे नाते सोडून माझ्या सोबत आली माझे सगळे नाते जपले आणि मी तिला समजून न घेता तिच काहीही न ऐकता तिच्याशी असा वागलो, माझ्यामुळे ती गेली "पण आता तो काही करू शकत नव्हता ती नेहमीसाठी त्याला सोडून गेली होती ... आता तीनेही त्याच्याशी अबोला धरला होता आणि तोही कायमचा। , , मित्रहो: -व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याची काळजी घ्या त्याला समजून घ्या, त्याच्या मरणानंतर रडून काही अर्थ नाही कारण मरणानंतर शत्रूही रडतात। आपल्या घरातील व्यक्तिवर खुप प्रेम करा ... आज तुम्ही त्यांना जवळ केले तर उद्या ते तुम्हाला जवळ घेतील .. राग आल्यास शांततेने समाजवा ..

Chapters

Related Books

Cover of संग्रह २

संग्रह २

by भा. रा. तांबे

Cover of Simple Sanskrit

Simple Sanskrit

by संकलित

Cover of Part 1: The Loss of Friends

Part 1: The Loss of Friends

by Abhishek Thamke

Cover of गीताधर्म और मार्क्सवाद

गीताधर्म और मार्क्सवाद

by स्वामी सहजानन्द सरस्वती

Cover of AYODHYA

AYODHYA

by Koenraad Elst

Cover of Negationaism in India - Concealing the Record of Islam

Negationaism in India - Concealing the Record of Islam

by Koenraad Elst

Cover of Psychology of Prophetism - A Secular Look at the Bible

Psychology of Prophetism - A Secular Look at the Bible

by Koenraad Elst

Cover of Update on the Aryan Invasion Debate

Update on the Aryan Invasion Debate

by Koenraad Elst

Cover of Arun Shourie Article Collection

Arun Shourie Article Collection

by Arun Shourie

Cover of Heroic Hindu Resistance to Muslim Invaders

Heroic Hindu Resistance to Muslim Invaders

by Sita Ram Goel