Bookstruck

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter List

हरवलेली मानुसकी आणि सुस्त पडलेली यंत्रणा...माणुसकीचा बळी जतो तो असा..
       खरं यावर लिहिणार नव्हतो पण राहवलं नाही म्हणून.. वेळ सकाळी 6.45 फोन खणखणला समोरून राजाभाऊ गायधनी बोलत होते उपनगर जवळ सेंट झेवियर्स शेजारी एक व्यक्ती अकॅसिडेंट झाल्याने रस्त्यावर पडली होती .. मी आणि माझ्या मित्रांनी त्यांना रस्त्यावरून बाजूला केले आहे .. 108 आणि 100 नं ला कॉल लावून पण रिस्पॉन्स मिळत नाही आहे.. आणि आम्हाला ड्युटीवर जायचे आहे तेंव्हा तुम्ही काहीतरी करा.. म्हंटलं मी लगेच निघतो तुम्ही काळजी करू नका..तडक उठलो अवघ्या 10 मि मी त्या ठिकाणी पोहचलो .. तिथे सकाळी सोबत फिरायला निघालेल्या काही व्यक्ती  मला बघताच बोलल्या कि कोणी थंबत नाही 108 रिस्पॉन्स देत नाही ..
     जवळ जवळ 75 वय वर्ष असलेली व्यक्ती माझ्या समोर डोके फुटून रक्त वाहत असलेल्या अवस्थेत पडलेली होती.. बघून मन सुन्न झालं.. 4 .. 5 रिक्षा थांबण्याचा प्रयत्न केला आधी आम्हाला बघून जायला तयार व्हायच्या पण अकॅसिडेंट झालेला आहे आणि ज्याला लागला आहे त्याला न्यायाचंय म्हणून कोणी तयार होईना तडक निघून जायचे.. शेवटी 55 60 तले एक रिक्षावाले त्या ठिकाणी थांबले आधी ते नाही म्हणाले पण त्यांना त्यांच्याच वयाचा दाखला दिल्यावर व सर्व जाबाबदरी मी घेतो तुम्हाला अडचण येणार नाही असं सांगितल्यावर त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर येण्याचे काबुल केले..
     झालं बीटको हॉस्पिटल गाठलं .. तिथे प्राथमिक ट्रीटमेंट केल्यावर डोक्याला जास्त मार असल्याने व पेशंट अनोळखी असल्याने आम्हाला इथे ठेवता येणार नाही तुम्ही सिव्हिल ला घेऊन जा .. असं आम्हाला सांगण्यात आलं..
     बाहेर येऊन बघतो तर समोर 108 उभी पण त्यांचे सतरा नखरे .. शेवटी आम्ही सिव्हील पोहचलो .. तिथे ऍडमिट करून केस पेपर काढून डॉक्टर्स कडे दिला ते म्हणाले पोलिसांना माहिती देऊन या .. तिथे गेलो असता ते म्हणाले 10 वाजे नंतर या..म्हणजे थबुं राहावं आणि फक्त माहिती देण्याच्या 5 मी च्या कामासाठी .. शेवटी चिडव्हिड झाली.. आणि नको नको हि..त्या बाबांना ऍडमिट करून 1 तास झाला होता तरीही आहे त्या कंडिशन मध्ये पडलेले मी बघत होतो..
    सर्वसाधारन माणसाची अवस्था ना घर का ना घाट का अशिच .. बाबा जगले वाचले तरीही आणि गेले तरीही फरक इतकाच होता की थंडीत कुडकुडण्यापेक्षा गेले चार तास आम्ही त्यांना फक्त एक उबदार बेड देऊ शकलो होतो.. त्या व्यतिरिक्त आमच्या हातात काहीही नव्हतं..
     खिन्न मनाने हॉस्पिटल मधून बाहेर पडताना यापुढे असले काम नको बाबा असे म्हणत माझ्या सोबतची व्यक्ती बाहेर पडली..सर्वसामान्य  माणूस मदतीस अजूनही का पुढे येत नाही याचा विचार करत सरकारने जरी संरक्षण दिल असल तरी यंत्रणा बदलायला तयार नसल्याने माणुसकीचा बळी जातो तो असा....
आपला
विक्रम राजभाऊ कदम
Being common
For uncommon social work

Chapter List