Bookstruck

श्लोक २९ वा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जनेषु दह्यमानेषु कामलोभदवाग्निना ।

न तप्यसेऽग्निना मुक्तो गङ्गाम्भःस्थ इव द्विपः ॥२९॥

कामलोभदावाग्नी । माजीं जळतां लोक तीन्ही ।

देखत असों जी नयनीं । वेगळा कोणी दिसेना ॥७॥

ते दावाग्नीमाजीं असतां । तूं न पोळसी गा अवधूता ।

नवल तूझी अक्षोभ्यता । नकळे सर्वथा आम्हांसी ॥८॥

वणवा जळे दोंही थडीं । गजें गंगाजळीं दिधली बुडी ।

त्यासी न लागती तापाच्या वोढी । तैसें निरवडीं तूज देखों ॥९॥

ऐशीं द्वंद्वें तूज नातळती । दृढ राहिलासी ब्रह्मस्थितीं ।

कांही एक करीन विनंती । कृपामूर्ति दयाळूवा ॥३१०॥

« PreviousChapter ListNext »