Bookstruck

प्रेममाहात्म्य

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

"झाले जे कवि, वंद्य त्यां जन गणो, ते मूढ कीं वाटती,

मूढां सत्य न, या असत्य रमवी, आराध्य यां कल्पना

नाहीं यां शिर, काय तें ह्रदयची सर्वस्व ऐशा जनां,

प्रेमाचा महिमा फुका फुगवुनी भारूड हे सांगती.

प्रेमा कल्पुनि भूप, सेवक दुज्या वृत्ती असें जल्पती,

प्रीतिप्रेरित सागरीं नर उडी टाकी, भया लेखि ना,

मारी ऐंद्र पदास लाथ, विष पी, सेवी महाकानना,

ऐसें हे कवि जल्पती, अमर हे होती ! कशी ही कृती !"

तत्त्वज्ञानमदें असें बरळती त्यांना असो ही नती !

नाहीं त्यां शिवला उदार नृप तो, ये कींव त्यांची खरी.

कोठें सागर, शैल, कान, सखे, जे तूझियासंगतीं

देती ना सुख या जना ? विष सुधा तुझेविना सुंदरी

ज्या तूझे नयनांत तो नृप उभा ह्रच्चित्र घेई करीं

त्यांना पाहुनि काय हो ह्रदयिं या सांगूं कसें तें तरी ?

« PreviousChapter ListNext »