Bookstruck

आलें तुझ्या रे दारीं नृपा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आलें तुझ्या रे दारीं नृपा, घालीं भिकेला करिं रे कृपा ! ध्रु०

नांव ऐकुनी तुझें

वाट दूर चालुनी

आलें उपाशी थकुनि भागुनी. १

मूठ घालितां मला

हीन दीन याचका

भांडार सारें रितेंच होय का ? २

ताट दाटलें तुझें

अन्न त्यांत राहिना,

उच्छिष्ट घालिं रे उपाशि या जना. ३

ज्ञानिया जनार्दना,

जनिस घातली न का ?

केला कुबेरापरि न का तुका? ४

मीच काय एकली

दारिं तुझ्या येउनी

जाईन विन्मुखी निराश होउनी? ५

घाल घाल रे नृपा,

वेळ काय लाविशी ?

जीव चालला, किती अंत पाहशी ? ६

« PreviousChapter ListNext »