Bookstruck

श्री..ची .. कविता.:-२

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

श्री.. ची कविता...२..*
-----------------------------------
       *✨.. झुमका .. ✨*

हळुच माझ्याकडे बघुन सखी
काय दाखवण्याचा प्रयत्न तुझा
केश उभारून ,काय ग दाखवते
का ते कानातले झुमके तर नव्हे..

ज्याला सोनेरी गोलाकार झालर..
त्यावर शोभते मोत्यांची माळ
शोभनिय ती तुझ्या चेहऱ्याची.
हीच तर नव्हे किमया झुमक्याची.

एक मोती तो खाली  लटकणारा
तुझ्या रूपाची तो महती सांगणारा
हळुच झुळुकासंग तो बहरणारा..
त्याला पाहता मी घायाळ होणारा..

हळुत नकळत  दाखवलीस तु
त्यात पुरता  मोहुन गेलो गं मी
तुझ्या डुलत्या झुमक्यामध्ये गं
तुझ्या प्रेमात  वाहुन गेलो गं मी..
====================
*लेखन :श्रीधर कुलकर्णी..

« PreviousChapter ListNext »